मुंबई : करोना संसर्गामुळे लागू र्निबध शिथिल होताच पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी पदपथ, रस्त्यांवरच पथाऱ्या पसरुन पादचाऱ्यांची वाट अडवण्यास सुरुवात केली आहे. तर सार्वजनिक वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्यात पालिका सपशेल अपयशी ठरल्याने अनेक भागात रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येत आहेत. त्याचा फटका पादचारी आणि वाहतुकीला बसत आहे. शिवडीमधील टोकरशी शिवराज मार्ग (टी. जे. रोड) हा त्यापैकीच एक. या भागातील रहिवाशांनी आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक वेळा पालिका कार्यालय आणि स्थानिक पोलीस चौकीचे उंबरठे झिजवले. परंतु कारवाईच्या नावाने नन्नाचा पाढा वाचला जात आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरुन केईएम रुग्णालयापुढे काही अंतरावर शिवडी परिसर सुरू होतो. या परिसरातील रहिवाशांच्या सुविधेसाठी गणपत पाटील मंडई उपलब्ध केली आहे. शिवडीतील बहुसंख्य नागरिक या मंडईत खरेदीसाठी येत असतात. मंडईच्या समोरच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जी. जे. रोडवर चाळी आणि टोलेजंग इमारती उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये या रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र र्निबध शिथिल होताच फेरीवाल्यांनी पदपथावरच नव्हे, तर रस्त्यावरही पथाऱ्या पसरल्या आहेत. जवळच मंडई असतानाही भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. या फेरीवाल्यांनी पदपथावरच कब्जा केला आहे. रस्त्यावर पदपथ आहे की नाही असाच तेथून जाणाऱ्याला प्रश्न पडतो. कपडे आणि अन्य वस्तूंचीही येथे विक्री केली जाते. इतकेच नव्हे तर रस्त्यावरच शेगडय़ा पेटवून कबाब शिजवून त्याची विक्रीही केली जात आहे. टी. जे. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई आहे. असे असतानाही रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, टेम्पो आदी वाहने बिनदिक्कतपणे उभी करण्यात येत आहेत.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

फेरीवाले आणि उभी करण्यात येणारी वाहने यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचा प्रचंड फटका या रस्त्यावरील वाहतुकीला बसत आहे. बेस्ट बस अथवा अवजड वाहन येथून जाताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. इतकेच नव्हे तर पादचाऱ्यांना चालायचे कुठून असा प्रश्न होतो. परिणामी, पादचाऱ्यांना छोटय़ा-मोठय़ा अपघातांचा सामना करावा लागतो. कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी हा रस्ता गर्दीमध्ये गुदमरुन जातो. परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयात या संदर्भात तक्रार केली. मात्र तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्यामुळे रहिवाशी, पादचारी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत.

या संदर्भात पालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  

फेरीवाले, वाहनांमुळे टी. जे. मार्ग गुदमरला

टी. जे. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई आहे. असे असतानाही रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, टेम्पो आदी वाहने बिनदिक्कतपणे उभी करण्यात येत आहेत.फेरीवाले आणि उभी करण्यात येणारी वाहने यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचा प्रचंड फटका या रस्त्यावरील वाहतुकीला बसत आहे. बेस्ट बस अथवा अवजड वाहन येथून जाताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. इतकेच नव्हे तर पादचाऱ्यांना चालायचे कुठून असा प्रश्न होतो. परिणामी, पादचाऱ्यांना छोटय़ा-मोठय़ा अपघातांचा सामना करावा लागतो. कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी हा रस्ता गर्दीमध्ये गुदमरुन जातो. परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयात या संदर्भात तक्रार केली. मात्र तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्यामुळे रहिवाशी, पादचारी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत.

या संदर्भात पालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.