भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आम्ही कोणाचा गेम करत नाही, असं वक्तव्य केलं. तसेच भाजपाचा पाचवा उमेदवार देखील निवडून येईल, असा दावा केला. यावेळी त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंवरही भाष्य करत टोला लगावला. ते सोमवारी (२० जून) मुंबईत विधानभवनात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

हरिभाऊ बागडे म्हणाले, “मतदानात माझा पाचवा क्रमांक होता. माझ्यासमोर आमदार मेहेत्रे होत्या. आमचे पाचही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. आम्ही ही लढाई कोणाबरोबर आहे हे सांगत नाही. आम्ही कोणाला लक्ष्य करत नाही. कोणाचा गेम करत नाही. आम्ही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो.”

Election Commission guidelines about Rahul Gandhi Abhishek Banerjee choppers searches
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Former Congress president Rahul Gandhi filed his candidature from Wayanad in Kerala
वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शनासह राहुल गांधी यांचा अर्ज; अमेठीमधून उमेदवारीबाबत मौन
shiv sena shinde group mla sanjay gaikwad
अपक्ष अर्ज का भरला? शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया…

“एकनाथ खडसेंच्या विधानसभा उमेदवारीवरही हरिभाऊ बागडे यांनी भाष्य केलं. आमच्या पक्षात होते तोपर्यंत ते आमचे, आमच्या पक्षातून गेलेले आमचे नाही,” असं म्हणत हरिभाऊ बागडे यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला.