कृपाशंकरसिंह यांच्याविरोधातील जनहित याचिका फेटाळली

मालमत्ता बळकावून आणि धमकावल्याच्या आरोपावरून मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली.

मालमत्ता बळकावून आणि धमकावल्याच्या आरोपावरून मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. तुळशीदास नायर यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाचे न्या. पी. व्ही. हरदास आणि न्या. मृदूला भाटकर यांच्या खंडपीठाने फेटाळली. 
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दंडाधिकाऱयांनी केलेल्या चौकशीमध्ये कृपाशंकरसिंह यांना क्लिन चीट देण्यात आल्याकडे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे लक्ष वेधले. कृपाशंकरसिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे दंडाधिकाऱयांच्या अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते गुन्हेगारी संहितेच्या कलम १५६(३) नुसार खासगी तक्रार करू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hc dismisses pil seeking cbi probe against kripashankar singh

ताज्या बातम्या