Premium

शुश्रूषागृह गंभीर रुग्णास उपचार नाकारू शकत नाही! ‘गोल्डन अवर’ नियमाच्या काटेकोर पालनाचे आरोग्य संचालनालयाचे ‘आयएमए’ला निर्देश

‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’संदर्भात आरोग्य संचालनालय आणि आयएमए यांच्यात प्रत्यक्ष आणि दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.

doctor
जीभेचं ऑपरेशन करण्याऐवजी अडीच वर्षांच्या मुलाची सुंता केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; डॉक्टर म्हणाले…

मुंबई : अपघातातील गंभीर रुग्ण, हृदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती किंवा अन्य काही कारणास्तव प्रकृती गंभीर असलेला रुग्ण शुश्रूषागृहात आल्यास त्याची आर्थिक परिस्थिती न पाहता त्याच्यावर प्राधान्याने उपचार करावेत. त्यानंतरच त्याला जवळील मोठय़ा रुग्णालयात हलवावे, अशा सूचना आरोग्य संचालनालयाने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’बरोबर (आयएमए) नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’संदर्भात आरोग्य संचालनालय आणि आयएमए यांच्यात प्रत्यक्ष आणि दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीला राज्यातील १७० पेक्षा अधिक ‘आयएमए’सदस्य उपस्थित होते. ‘‘शुश्रूषागृहांमध्ये गंभीर स्थितीत आलेल्या रुग्णावर प्राधान्याने उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यावर भर द्यावा. हे प्राथमिक उपचार करताना रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार करू नये. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय चिठ्ठीसह पाठवावे. ‘गोल्डन अवर’ उपचार पद्धतीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आरोग्य संचालनालयाने ‘आयएमए’ला केल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 04:03 IST
Next Story
राज्यातील शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर