मुंबई : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा ठप्प होऊन रुग्णांचे हाल होण्याची भीती आहे.

राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने हा संप पुकारला आहे. या संपामध्ये रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत.

Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
94 thousand mill workers are eligible home
आतापर्यंत ९४ हजार गिरणी कामगार पात्र, चार हजार कामगार अपात्र
post of Health Director City
‘आरोग्य संचालक शहर’ हे पद तीन वर्षांनंतरही कागदावरच, शहरी आरोग्याविषयी सरकार उदासीन…
There is only a month stock of tuberculosis drugs and the central government has ordered the states to purchase drugs at the local level
 क्षयरोग औषधांचा महिनाभराचाच साठा; स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना आदेश

मुंबईतील राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय आणि कामा रुग्णालयातील सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही. आमच्या मागण्यांचे निवेदन जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना दिल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली.

सरकारी कर्मचारी संपावर ठाम
मुंबई : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीवर राज्य सरकारी कर्मचारी संघटना ठाम असून, नियोजित संप कोणत्याही परिस्थितीत यशस्वी केला जाईल, असा विश्वास कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संप मागे घेऊन यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांचा अवधी आहे. कर्मचारी संघटनांची सोमवारी राज्य सरकारबरोबर बैठक होणार आहे.