मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे वसाहतीत कारशेडसाठी झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे.

हेही वाचा : शतकांचं शतक झळकावणाऱ्या मुंबईच्या क्रिकेटपटूचं सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

न्यायालयाने आरेतील झाडे तोंडण्यास सक्त मनाई केली आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. न्यायालयाने सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे. सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि याचिकाकर्त्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. पण आता न्यायालयाच्या २७ सप्टेंबर रोजीच्या संदर्भसूचित प्रकरण समाविष्ट असल्याने सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.