scorecardresearch

मुंबई, ठाण्यात उन्हाचा चटका ; कमाल तापमान ३८ अंशांवर

डहाणू येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल आणि २३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

कुलाबा येथे रविवारी ३७.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे २३.५ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ सोमवारीही कायम राहणार असून, मंगळवारपासून त्यात किंचित घट होईल.

डहाणू येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल आणि २३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दोन्हींमध्ये अनुक्रमे सरासरीच्या तुलनेत ७ आणि २ अंशांची वाढ झाली होती. समुद्र किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ अंशांच्या वर जाणे हा उष्णतेच्या लाटेसाठी पहिला निकष आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heat in mumbai thane maximum temperature at 38 degrees zws

ताज्या बातम्या