मुंबई : मे महिन्यात देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तर किनारपट्टी वगळता उर्वरित राज्यात उन्हाळी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मे महिन्याचा हवामानाचा अंदाज बुधवारी जाहीर केला. देशातील कमाल, किमान तापमानातील वाढीचा कल मे महिन्यात कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारतात भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मे महिन्यात देशात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरी तीन असतात. यंदा त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टी आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांचा अंदाज आहे. तापमानाही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र, उष्णतेच्या लाटा आणि तापमानातून दिलासा देणारी बाब म्हणजे, मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मे महिन्यात सरासरी ६१.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर किनारपट्टी वगळता राज्याच्या सर्वच भागात उन्हाळी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात प्रशांत महासागरात तटस्थ स्थिती कायम राहील, तर हिंदी महासागरातील हिंद महासागरीय द्विध्रुविता ही तटस्थ राहण्याची शक्यता आहे.