पावसाने मुंबईची ‘तुंबई’, येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे

मुसळधार पावसामुळे कुर्ला येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे (Express Photo: Nirmal Harindran)

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि पालघरला मुसळधार पावसाचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले असून अनेकजण रस्त्यांवर तसंच रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

Live Blog

22:44 (IST)04 Sep 2019
रेल्वेची काय स्थिती ?

रात्री १०.१५ वाजता रेल्वेची स्थिती – 

मध्य रेल्वे – ठाणे ते सीएसएमटीदरम्यान ठप्प

हार्बर – वाशी ते सीएसएमटीदरम्यान ठप्प

पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते वसईदरम्यान वाहतूक सुुरु

22:41 (IST)04 Sep 2019
हजारो मुंबईकर कार्यालये आणि रेल्वे स्थानकांवर अडकले

मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक मागील आठ ते नऊ तासांपासून ठप्प आहे. लोकलचा बोजवारा उडल्याने हजारो मुंबईकर रेल्वे स्थानकांवर तसेच कार्यालयांमध्ये अडकून पडले आहेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बंद झालेली वाहतूक रात्री दहा वाजल्यानंतरही सुरु झालेली नाही. त्यामुळेच हजारो कर्मचारी ऑफिसमध्ये अडकून पडले आहेत. तर घरी जाण्यासाठी निघालेले अनेकजण स्थानकांवर अडकून पडले आहेत.

https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-rains-thousands-of-mumbaikar-stranded-in-offices-and-stations-scsg-91-1964464/

22:03 (IST)04 Sep 2019
पश्चिम रेल्वेवरील चारही मार्ग सुरु

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते अंधेरी दरम्यान वाहतूक सुरु झाली आहे. ९ वाजता चर्चगेट ते विरारदम्यान चारही मार्गांवरील वाहतूक सुरु झाली आहे.

21:59 (IST)04 Sep 2019
महापालिकेने निवाऱ्याची सोय केलेल्या शाळांची यादी

मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवा बाधीत झाल्या आहेत. अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर खोळंबले असून जागोजागी अडकून पडले आहेत. मुंबई महापालिकेने रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी तसंच इतर व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-arrange-shelter-for-stranded-commuters-in-schools-mumbai-rain-sgy-87-1964467/

21:58 (IST)04 Sep 2019
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवासी अडकले

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात गेल्या सात ते आठ तासांपासून प्रवासी अडकले आहेत. लहान मुलांच्या खाण्यापिण्याचे हाल होत असून एक प्रवासी बेशुद्ध पडला आहे.

21:36 (IST)04 Sep 2019
सीएसटीएम स्थानकावर प्रवाशांची घोषणाबाजी

सीएसटीएम स्थानकावर संतप्त प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत

21:30 (IST)04 Sep 2019
मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा, तुफान गर्दी

21:24 (IST)04 Sep 2019
महापालिकेकडून लोकांसाठी निवाऱ्याची सोय
21:20 (IST)04 Sep 2019
मध्य रेल्वे कधी सुरु होईल सांगू शकत नाही

मध्य रेल्वे कधी सुरु होईल सांगू शकत नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

21:17 (IST)04 Sep 2019
लोअर परळवरुन लोकल विरारकडे रवाना

लोअर परळ स्थानकावर रखडलेली धीम्या मार्गावरील लोकल विरारकडे रवाना झाली आहे.

21:06 (IST)04 Sep 2019
चर्चगेट स्थानकावर प्रवासी खोळंबले आहेत

20:52 (IST)04 Sep 2019
सिद्धिविनायक मंदिराकडून लोकांच्या जेवण्याची आणि राहण्याची सोय

पावसात अडकलेल्यांसाठी सिद्धिविनायक मंदिरात जेवण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

20:49 (IST)04 Sep 2019
विरार स्थानकावर अडकलेल्यांसाठी माणुसकीचा हात
20:40 (IST)04 Sep 2019
शाळांमध्ये प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय
20:26 (IST)04 Sep 2019
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जेवण्याची सोय

मुंबईत ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुंबईकरांसाठी परळचा राजा नरेपार्क मंडळाकडून जेवणाची सोय करण्यात आली आहे.

20:23 (IST)04 Sep 2019
सीएसटीएम स्थानकाबाहेर प्रचंड ट्राफिक जॅम

सीएसटीएम स्थानकाबाहेर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रेल्वे ठप्प असल्याने रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडणारे रस्त्यांवरही अडकून पडले आहेत.

20:21 (IST)04 Sep 2019
दादरमध्ये रस्त्यावरुन चालत निघालेल्या प्रवाशांसाठी खाण्याची सोय

दादरवरुन ठाण्यासाठी चालत काही प्रवासी निघाले असून काही रहिवाशांनी त्यांच्यासाठी खाण्याची सोय करण्यात आली आहे.

20:12 (IST)04 Sep 2019
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी

रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु असून अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अंधेरी स्थानकात रेल्वे रोखण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

18:44 (IST)04 Sep 2019
पश्चिम रेल्वेच्या रुळांवरील पाणी ओसरु लागलं आहे

18:40 (IST)04 Sep 2019
पाणी ओसरल्यानंतर चर्चगेट आणि वसईदरम्यान दोन्ही बाजूने रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे
18:39 (IST)04 Sep 2019
पश्चिम मार्गावरील काही एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे
18:37 (IST)04 Sep 2019
चर्चगेटहून पहिली लोकल रवाना

चर्चगेटहून वसईला पहिली लोकल रवाना झाली आहे. हळूहळू वाहतूक पुर्वपदावर येत आहे. 

18:33 (IST)04 Sep 2019
घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

18:16 (IST)04 Sep 2019
रेल्वेची सध्याची परिस्थिती

मध्य रेल्वे – ठाणे ते सीएसएमटी दरम्यान ठप्प
हार्बर – वाशी ते सीएसएमटी दरम्यान ठप्प
पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर ठप्प, विशेष फास्ट लोकल धावत आहेत. वसई – विरार लोकल सेवा ठप्प.
ट्रान्स हार्बर – उशिराने धावत आहेत

17:41 (IST)04 Sep 2019
मुंबईतील गगनचुंबी इमारत झाली धबधबा

17:30 (IST)04 Sep 2019
अंधेरीवरुन चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना

सुमारे दोन तासांनी अंधेरीवरुन चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना करण्यात आली आहे

17:28 (IST)04 Sep 2019
नालासोपारा रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी
17:05 (IST)04 Sep 2019
कुर्ला येथील क्रांतीनगरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

कुर्ला येथील क्रांतीनगरमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

16:46 (IST)04 Sep 2019
यंत्रणांना दोष देण्यापेक्षा परिस्थितीतून मार्ग काढू – आदित्य ठाकरे

सध्या यंत्रणांना दोष देणायऐवजी हवामाना बदलाशी कसा सामना करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे

16:10 (IST)04 Sep 2019
काँग्रेस नेत्या प्रियंका दत्त यांनी ट्विट करत दर्शवली कुर्ला येथील परिस्थिती
16:07 (IST)04 Sep 2019
रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सकाळी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, पावसाची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाकडून मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

https://www.loksatta.com/trending-news/lets-know-about-red-orange-and-yellow-alert-nck-90-1964042/

16:04 (IST)04 Sep 2019
मुसळधार पावसामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत
15:57 (IST)04 Sep 2019
विरार पश्चिमेला पाण्याचं साम्राज्य

(Photo: Pradeep Pawar)

15:53 (IST)04 Sep 2019
सायन स्थानकाला नदीचं स्वरुप

15:44 (IST)04 Sep 2019
पश्चिम रेल्वे विस्कळीत

पावसामुळे अद्याप पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे.  चर्चगेट ते अंधेरी रेल्वेसेवा पूर्णपणे बंद आहे. 

15:04 (IST)04 Sep 2019
सायन स्थानकावर रुळांवर पाणी
15:00 (IST)04 Sep 2019
माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान लोक ट्रॅकवर चालत आहेत

पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान लोक ट्रॅकवर उतरुन चालत आहेत. दरम्यान सेवा बंद असल्याची घोषणा स्थानकांवर केली जात आहे.

14:58 (IST)04 Sep 2019
पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा
14:51 (IST)04 Sep 2019
वसई-विरारमध्ये ३६ तासांत ५०० मिमी पावसाची नोंद
14:33 (IST)04 Sep 2019
कांजूरमार्ग-विक्रोळी दरम्यान रुळांना नद्यांचं रुप

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rain in mumbai thane raigad monsoon sgy

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या