scorecardresearch

Premium

कर्नाळयात पूल खचला मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

राज्याच्या वेगवेगळया भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

कर्नाळयात पूल खचला मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

राज्याच्या वेगवेगळया भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत वडाळा येथे रस्ता खचून सात गाडयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असताना आता रायगड जिल्ह्यात कर्नाळा येथे पूल खचल्याची घटना घडली आहे.

पूल खचल्यामुळे मागच्या तीन तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आता वाहने पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आली आहेत.

pune satara road khambatki ghat, traffic jam in khambatki ghat
सातारा : खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी
Bharatmala Project
गडचिरोली : भारतमाला परियोजना, समृद्धी महामार्गाला रानटी हत्तींचा धोका
development tribals near Mumbai
विश्लेषण : मुंबईलगतच्या भागातील आदिवासींसाठी विकासाची वाट बिकटच का ठरते?
mahabaleshwar panchgani kaas plateau in satara house full with tourist due to consecutive holidays
सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी कास पठार हाऊसफुल्ल

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जिल्ह्याच्या वेगवेगळया भागांमध्ये पेण १६० मिमि अलिबाग १५६ मिमि, पनवेल १५८ मिमि, उरण १०६ मिमि, सुधागड १३० मिमि, माथेरान १५५ मिमि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रायगड शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सरासरी एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळात ( एक जून ते २५ जून ) दरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस कोसळला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गोवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain karnala bridge in raigad traffick jam at mumbai goa highway

First published on: 25-06-2018 at 11:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×