scorecardresearch

Premium

Mumbai Monsoon Update: मुंबई, ठाणेसह पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Updates शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

Mumbai Monsoon Latest Update
मान्सून अपडेट

मुंबई : Mumbai Weather Forecast गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच मुंबई शहर तसेच उपनगरांत पुन्हा दमदार हजेरी लावली. मुंबई सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये गुरुवारी व शुक्रवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे या भागात पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

हेही वाचा >>> Weather Update: पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, दहीहंडी पावसातच फुटणार

prices petrol diesel
Petrol-Diesel Price on 8 October: मुंबईकरांना दिलासा मात्र, ‘या’ शहरांमध्ये वाढले पेट्रोलचे दर
Petrol Price
Petrol-Diesel Price on 2 October: मुंबई-पुणे येथे कसे आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? पाहा एका क्लिकवर
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel Price on 1 October: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या…
Petrol Diesel Price
Petrol-Diesel Price on 30 September: मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? जाणून घ्या 

गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड, रत्नागिरी, तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने ‌‌व्यक्त केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain warning in mumbai thane and palghar mumbai print news ysh

First published on: 07-09-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×