मागच्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मान्सूनच्या पावसाने आज सलग तिसऱ्या दिवशीही विश्रांती घेतलेली नाही. सोमवार पहाटेपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. अनेक नोकरदार मंडळींनी कामावर जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरुनच काम करणे पसंत केले. मागच्या तीन तासात मुंबईच्या वेगवेगळया भागात झालेल्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. जाणून घेऊया मुंबईच्या कुठल्या भागात किती पाऊस झाला.

सकळी ८.३० ते ११.३० या वेळेत झालेला पाऊस
कुलाबा – ४० मिमि
वरळी -४७ मिमि
माझगाव – ८ मिमि
दादर – ६३ मिमि
वांद्रे पश्चिम – ५२ मिमि
सांताक्रूझ – ३५ मिमि
अंधेरी -४१ मिमि
गोरेगाव – ५४ मिमि
मालाड -३३ मिमि
कांदिवली – २८ मिमि
चारकोप – २२ मिमि
बोरीवली – ६० मिमि
घाटकोपर – १६ मिमि
पवई – ३२ मिमि
मुलुंड – ३७ मिमि
नेरुळ – ४४ मिमि
पनवेल – ६१ मिमि