पुढचे तीन ते चार दिवस तुफानी पावसाचे!

IMD ने व्यक्त केला अंदाज

प्रतिनिधिक छायाचित्र

केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. आता ६,७,८ आणि ९ जून हे चारही दिवस तुफानी पावसाचे असतील असा अंदाज IMD या संस्थेने वर्तवला आहे. ५ जून म्हणजेच आजही उत्तर आणि दक्षिण कोकणात चांगला पाऊस होईल असेही आयएमडीने म्हटले आहे. आयएमडीने या संदर्भातले एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण कोकणात कसा पाऊस पडेल त्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे.

आयएमडीने व्यक्त केलेला अंदाज
उत्तर कोकण विभाग
५ जून २०१८
रायगड जिल्ह्यात विजा कडाडून पाऊस पडेल. मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज आहे

६ जून २०१८

रायगड जिल्हा आणि इतर परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज

७ जून २०१८
ठाणे आणि मुंबई भागात जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजा चमकण्याचा अंदाज

९ जून २०१८
उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज

 

दक्षिण कोकण

५ जून २०१८
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज

६ जून २०१८
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
७ जून २०१८
विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज

८ आणि ९ जूनलाही अशाच प्रकारे पाऊस पडेल असेही आयएमडीने म्हटले आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये सोमवारी संध्याकाळी पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईहून घरी जाणाऱ्या नोकरदारांची चांगलीच त्रेधा उडाली. आता येणारे काही दिवसही मुसळधार पावसाचेच असणार आहेत. त्यामुळे छत्री, रेनकोट सोबत बाळगायला विसरु नका!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Heavy rains in mumbai and konkan in coming 3 4 days says imd