scorecardresearch

मुंबई विमानतळावर ३४.७९ कोटींचे हेराॅईन जप्त ; परदेशी महिलेला अटक

सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहा येथून कतार एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर केनियन नागरिक असलेली महिला आली.

मुंबई विमानतळावर ३४.७९ कोटींचे हेराॅईन जप्त ; परदेशी महिलेला अटक
(संग्रहित छायाचित्र)

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३४ कोटी ७९ लाख रुपये किंमतीचे ४ हजार ९७० ग्रॅम हेराॅईन जप्त केले आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून ती केनियाची नागरिक आहे. न्यायालयाने आरोपी महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली.

सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहा येथून कतार एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर केनियन नागरिक असलेली महिला आली. संशयास्पद हालचालीवरुन सीमा शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली. त्याच्या जवळील सामानाच्या तपासणी ट्रॉली बॅगच्या पोकळीत लपवलेले ४ हजार ९७० ग्रॅम हेराॅईन अधिकाऱ्यांना सापडले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३४.७९ कोटी रुपये आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या महिलेला अटक करण्यात आली आहे.

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या(एआययू) अधिकाऱ्यांनी यापूर्वी सुमारे ४९० ग्रॅम कोकेनच्या तस्करीप्रकरणी केनिया देशातील नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पाच कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या