मुंबई विमानतळावर ३४.७९ कोटींचे हेराॅईन जप्त ; परदेशी महिलेला अटक | Heroin seized at Mumbai airport mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई विमानतळावर ३४.७९ कोटींचे हेराॅईन जप्त ; परदेशी महिलेला अटक

सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहा येथून कतार एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर केनियन नागरिक असलेली महिला आली.

मुंबई विमानतळावर ३४.७९ कोटींचे हेराॅईन जप्त ; परदेशी महिलेला अटक
(संग्रहित छायाचित्र)

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३४ कोटी ७९ लाख रुपये किंमतीचे ४ हजार ९७० ग्रॅम हेराॅईन जप्त केले आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून ती केनियाची नागरिक आहे. न्यायालयाने आरोपी महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली.

सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोहा येथून कतार एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर केनियन नागरिक असलेली महिला आली. संशयास्पद हालचालीवरुन सीमा शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत तिची चौकशी सुरू केली. त्याच्या जवळील सामानाच्या तपासणी ट्रॉली बॅगच्या पोकळीत लपवलेले ४ हजार ९७० ग्रॅम हेराॅईन अधिकाऱ्यांना सापडले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३४.७९ कोटी रुपये आहे. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या महिलेला अटक करण्यात आली आहे.

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या(एआययू) अधिकाऱ्यांनी यापूर्वी सुमारे ४९० ग्रॅम कोकेनच्या तस्करीप्रकरणी केनिया देशातील नागरिक असलेल्या एका महिलेला अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत पाच कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ

संबंधित बातम्या

विनयभंगाच्या आरोपांत महिलेला एक वर्षाची शिक्षा; न्यायालयाचा महत्वाचा निकाल
गुजरात निवडणुकीसाठी जाणे हे अधिकृत काम आहे का?; न्यायालयाचे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांना खडे बोल
पासपोर्टसाठी बनावट कागदपत्र सादर करणार्‍या त्रिकुटाला अटक
पोलिसांना सहा महिन्यांपासून प्रवासभत्ता नाही!; तक्रार करणाऱ्या फौजदारावरच कारवाई
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वे तुडुंब!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs NZ 2nd ODI: संततधार पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना अखेर करण्यात आला रद्द, टीम इंडियाचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले
“काका तू रडायचास…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली ‘ती’ जुनी आठवण
‘महाराष्ट्र सरकार आम्हाला कोणतीच सुविधा देत नाही’; सांगलीतील जत तालुक्यात कर्नाटक समर्थनार्थ फलकबाजी
ज्योतिषाचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात, सापाला जीभ दाखवली अन् आयुष्यभरासाठी गमावला…
बादशाहच्या गाण्यावर धोनी आणि पांड्याने ब्रदर्सने धरला ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल