कामाचे वाढते तास, बदलती जीवनशैली, व्यसनांचे वाढते प्रमाण, अवेळी खाणे आदी विविध कारणांमुळे तरूणांमध्ये शारीरिक, तसेच मानसिक व्याधीचे प्रमाण वाढत असून यातूनच उच्च रक्तदाबाच्या विकाराला सुरुवात होते. उच्च रक्तदाब हे जगभरातील मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक बनले आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सतत एका जागी बसून काम केल्यामुळे तरुणांच्या शरीराची हालचाल मंदावतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या बळावत आहे. वयाच्या पंचविशीमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या जडत असल्याचे निदर्शनास आले आहे. उत्पादन क्षेत्र कमी होऊन, सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान संक्षम सेवेसह (बीपीओ) विविध क्षेत्रांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

हेही वाचा >>> कोणत्या वयात डायबिटीज होण्याचा धोका सर्वात जास्त असतो? ‘ही’ ५ लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा

पोषक आहाराचा अभाव, कामांचे वाढते तास आदींमुळे निद्रानाश, वारंवार छातीत दुखणे, ताणतणाव वाढत आहेत आणि या समस्येचे रुपांतर पुढे हृदयविकारात होत आहे. तसेच तरूणांमधील व्यसनांच्या वाढत्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो आणि त्याचा परिणाम डोळे, हृदय आणि मूत्रपिंडावर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या दहा वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यात पंचवीस ते तीस वयोगटातील रुग्णांचा समावेश असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उच्च रक्तदाबाची लक्षणे तात्काळ लक्षात येत नाहीत. मात्र हृदय, डोळे, किडनी, मेंदूवर त्याचा परिणाम होतो. यामुळेच हृदयविकाराचा झटका येणे, किडनी निकामी होणे, अंधत्व येते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

सोशल मिडियाचा अतिरेकी वापर, तसेच चांगल्या वाईट घटकांच्या परिणामांमुळे अनेकांना नैराश्येच्या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे हृदयविकार, पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असते.

डॉ. सायली पेंडसे, हृदयविकार तज्ज्ञ

दैनंदिन जीवनशैलीतील अनियमितता, तसेच सतत विचार करणे हे हृदयविकाराला आमंत्रण देण्याचे मुख्य कारण आहे. याचबरोबर घर आणि कार्यालय अशा दुहेरी भूमिका बजाविणाऱ्या महिलांमध्ये रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सनिकेत दीक्षित, हृदयरोग तज्ज्ञ