मुंबई : दत्तक मुलगी गतिमंद असल्याचे सांगून तिच्या गर्भपाताची मागणी करणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने नुकतेच आश्चर्य व्यक्त केले. मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर तिची काळजी घेण्याऐवजी तिला रात्रभर घराबाहेर कसे सोडले, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी केला.

मुलगी गतिमंद असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. तर तिला रात्री १० ते दुसऱ्या सकाळी आठ वाजेपर्यंत घराबाहेर कसे सोडू शकता? तसेच, ती सहा महिन्यांची (१९९८) असताना तुम्ही स्वेच्छेने तिला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले होते. त्यामुळे, मुलगी हिंसक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे आता तुम्ही म्हणू शकत नाही आणि तिची काळजी घेण्याची जबाबदारी झटकू शकत नाही, असेही न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या वृद्ध दाम्पत्यांना सुनावले. त्याच वेळी, जे. जे रुग्णालयातील वैद्याकीय मंडळामार्फत याचिकाकर्त्यांच्या २३ वर्षांच्या मुलीची वैद्याकीय तपासणी करण्याचे आणि तिच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

actress Dimple Jhangiani names her daughter Shivona
प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नानंतर ८ वर्षांनी मुलीला दिला जन्म; म्हणाली, “आम्हाला वाटलं की मुलगा होईल, त्यामुळे…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Primary teachers committee alleges that educational materials are being distributed to government schools under the name of Asr
‘असर’च्या नावाखाली शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी, प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप…
dhananjay munde karuna sharma Controversy
Karuna Munde: ‘वाल्मिक कराडचा मुलगा कोट्याधीश, पण धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंनी मुलाबाबत का सांगितलं?
Chhattisgarh High Court grants divorce to man due to wife’s refusal to live with in-laws.
“पतीला कुटुंबापासून वेगळे करणे…”, सासू-सासऱ्यांबरोबर राहण्यास नकार देणार्‍या महिलेविरोधात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Prenatal diagnosis of well developed fetus in fetu
महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ!.. काय आहे ‘फिट्स इन फिटू’ हा दुर्मिळ प्रकार?
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार

तत्पूर्वी, किशोरवयापासून मुलगी हट्टी होती आणि ऐकत नव्हती, असा दावा पालिकांकडून करण्यात आला. त्यावर, मुलीला अत्याधिक काळजीची गरज असताना तिच्या मानसिक अस्थिरतेचा दाखला देऊन याचिकाकर्ते आपल्या कर्तव्यापासून पळ काढत असल्य़ाचेही न्यायालयाने सुनावले. पालकांची या प्रकरणातील भूमिका अविवेकी असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. त्याचप्रमाणे, मुलगी बेरोजगार असल्याचे कारण गर्भपातासाठी देण्यात येत असले, तरी हे कारण गर्भपाताच्या परवानगीसाठी पुरेसे नसल्याचेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader