मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक

पोलिसांनी सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत दोन मुलींची सुटका केली आहे

मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. यावेळी दोन मुलींची सुटका केली आहे. पोलिसांनी कारवाई करत मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाऱ्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींमधली एक मॉडेल आहे.

पोलीस उपायुक्त डी स्वामी यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर धाड टाकून पर्दाफाश करत अटकेची कारवाई करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी ग्राहक असल्याचं भासवत आरोपींशी संपर्क साधला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींची भेट घेतली.

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी कारवाई केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही दोन तरुणींची सुटका केली असून, दोघींना अटक केली आहे,” अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: High profile sex racket busted in mumbai actress arrested goregaon sgy

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या