मुंबई : मुंबईत मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सकाळी अवघ्या सहा तासांमध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.  कांदिवली परिसरात सर्वाधिक ८३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मंगळवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने दुपारी काहीशी विश्रांती घेतली. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४९.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहर भागात ४४.२० मिमी आणि पूर्व उपनगरात ३६.५५ मिमी पावसाची नोंद झाली. शहर भागात हाजीअली येथे सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद झाली.

कुठे —– किती पाऊस (मिमी मध्ये)

कांदिवली      ….८३

चिंचोली       …७८

दहिसर        ….७६

बोरिवली       …७५

हाजीअली .     …६१

दादर .        …५९

भायखळा      …५६

वरळी, ग्रँट रोड .….५५

भांडूप         ….४६