मुंबई : जुलै महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाल तापमानाची विक्रमी नोंद शुक्रवारी झाली. वेधशाळेच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये शुक्रवारी कमाल तापमानाची ३६.२ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. यापूर्वी २२ जुलै १९६० रोजी ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील ही विक्रमी नोंद मानली जात होती. मात्र कमाल तापमानाचा हा विक्रम शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी मोडीत निघाला. जुलैच्या सुरुवातीला कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दडी मारल्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारा गारवा हरपला असून मुंबईकर उकाडय़ाने हैराण होऊ लागले आहेत. जुलै महिन्यातील कमाल तापमानाने शुक्रवारी विक्रम नोंदवला. वेधशाळेच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये शुक्रवारी ३६.२ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद झाली. त्यात सरासरी सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2019 रोजी प्रकाशित
मुंबईत जुलै महिन्यातील विक्रमी तापमानाची नोंद
जुलै महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाल तापमानाची विक्रमी नोंद शुक्रवारी झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-07-2019 at 03:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest temperatures in july month record in mumbai zws