गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ७८.६३ टक्के झाला आहे. गेल्या सहा वर्षातील हा या दिवशीचा सर्वाधिक साठा आहे. सातही जलाशयात मिळून सध्या ११ लाख ३८ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणी तुटवड्याची चिंता मिटली आहे.

विहार, तुळशी हे तलावही भरण्याच्या मार्गावर –

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून सध्या ७८.६३ टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत खालावलेला पाणीसाठा या आठवड्याभरात चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा तिप्पट पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर आणि तानसा हे तलाव भरून वाहू लागल्यानंतर आता विहार, तुळशी हे मुंबई जवळचे तलावही भरण्याच्या मार्गावर आहेत.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
Water reserves in the country at 35 percent Where is the worst situation
देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर… कुठे आहे सर्वाधिक बिकट स्थिती?
idli rajma among top 25 dishes most damaging biodiversity reseach
आलू पराठ्यापेक्षा इडली जास्त हानिकारक, चणा मसाला, राजमा खाण्यापूर्वी ‘हा’ धक्कादायक अहवाल वाचाच

धरणे काठोकाठ भरतील अशी अपेक्षा –

मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडे चौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. सध्या सातही धरणात मिळून ९ लाख ५२ हजार ५५० दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. अजून पावसाचे तीन महिने शिल्लक असून तोपर्यंत धरणे काठोकाठ भरतील अशी अपेक्षा आहे.

सहा वर्षांचा १४ जुलैपर्यंतचा जलसाठा –

वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी

२०२२ -११,३८,097 …… ७८.६३ टक्के

२०२१ – २,४९,४५९…. १७.२४टक्के

२०२० – ३,७३,४६७….. २५.८० टक्के

२०१९ – ७,०६,३१७…… ४८.८० टक्के

२०१८ – ९,३४,२११…… ६४.५५ टक्के

२०१७ – ९,४८,३२५…… ६५.५२ टक्के