scorecardresearch

घाटकोपरच्या मैदानात ऐतिहासिक तोफांचे जतन; मुंबईकरांना आठ फूट लांब तोफा पाहता येणार

या तोफा जतन करण्यासाठी खास चाके तयार करवून घेतली असून त्यावर या तोफा ठेवण्यात आल्या आहेत.

घाटकोपरच्या मैदानात ऐतिहासिक तोफांचे जतन; मुंबईकरांना आठ फूट लांब तोफा पाहता येणार
ऐतिहासिक तोफा

घाटकोपर येथील उद्यानांमध्ये ऐतिहासिक तोफा जतन करण्यात आल्या आहेत. साधारण १८५६ सालातील या आठ फुटी तोफा मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू विभागाने जतन केल्या आहेत. घाटकोपर पूर्वेकडील लायन्स पार्क आणि हेगडेवार उद्यान येथे दोन तोफा जतन करून प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. तोफा जतन करण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच त्या मुंबईकरांना पाहता येणार आहेत.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन? लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता

घाटकोपरच्या लायन्स पार्क उद्यानात दोन तोफा गेल्या कित्येक काळ पडून होत्या. आठ फूट लांब असलेल्या एकसंघ तोफा ऊन पावसाचा मारा सोसत उद्यानात पडून होत्या. या तोफा जतन करण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला होता. उद्यान विभागाने तसा प्रस्ताव महानगरपालिकेच्या परिरक्षण विभागाला दिला होता. त्यानुसार परिरक्षण विभागाचा भाग असलेल्या पुरातन वास्तू जतन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून या दोन्ही तोफा जतन करून प्रदर्शनार्थ ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून या तोफाचे जतन करण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होत आले आहे.

हेही वाचा- वांद्रे-वरळी सागरी सेतू वाहतूकीसाठी आणखी सुरक्षित केला जाणार, भीषण अपघातानंतर एमएसआरडीसीला आली जाग

या तोफांबाबत माहिती देताना कार्यकारी अभियंता संजय सावंत यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या तोफा उद्यानात होत्या. तोफा तेथे कशा आल्या याबाबत कोणतीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. या तोफा जतन करण्यासाठी खास चाके तयार करवून घेतली असून त्यावर या तोफा ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीची पोलिसांसह चार जणांना धडक

पूर्वी तोफांची ने – आण करण्यासाठी चाकाची व्यवस्था असे. तशाच प्रकारची चाकांची बैठक तयार करण्यात आली आहे. या तोफा मजबूत लोखंडी असून इतक्या वर्षात त्यावर गंज चढलेला नाही. याच कास्ट आयर्न म्हणजे विशिष्ट लोखंडापासून चाके तयार करण्यात आली असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी पालिकेने ४५ लाख रुपये खर्च केले आहेत. तोफा स्वच्छ करून त्या एका दगडी स्तंभावर ठेवण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या