मुंबई : उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यामागे राजकीय नव्हे, तर ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक किंवा जातीय द्वेष, तेढ निर्माण होणार नाही, असा दावा राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केला. याउलट स्कंद पुराण आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या गॅझेटमध्येही (१९०९च्या इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया) उस्मानाबादचे नाव धाराशिव असल्याचेही नमूद होते, असा दावाही सरकारने केला. तसेच आपल्या निर्णयाचे समर्थन केले. उस्मानाबादच्या नामकरणामुळे बहुसंख्य नागरिकांनी आनंद साजरा केल्याचा दावाही राज्य सरकारने प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.

Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
Panvel, administrative building Panvel,
पनवेल : प्रशासकीय भवनाच्या विकासाचा मार्ग मोकळा, ‘त्या’ तीन गाळे मालकांचा दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला
article about supreme court s verdict on sub classification of scs and sts
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की मत? अनुसूचित जाती व जमातींचे उपवर्गीकरण
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
PIL Challenges Free Schemes by maharashtra State Government, Bombay High Court, Public Interest Litigation,
करदात्यांचे पैसे मोफत का वाटत आहात? उच्च न्यायालयात याचिका….
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत