scorecardresearch

हीट अँड रन : कारने अचानक घेतला यु-टर्न, धडकेत दोन बाईकस्वारांचा मृत्यू

लोअर परेलच्या सेनापती बापट फ्लायओव्हरवरून एका कारने अचानक यु टर्न घेतला आणि…

हीट अँड रन : कारने अचानक घेतला यु-टर्न, धडकेत दोन बाईकस्वारांचा मृत्यू
(फोटो : प्रातिनिधिक)

मुंबईत ‘हीट अँड रन’चं एक प्रकरण समोर आलं आहे. लोअर परेल भागात एका बाईक आणि कारमध्ये झालेल्या धडकेत दोन तरूणांनी आपला जीव गमावला आहे. लोअर परेलच्या फिनिक्स मॉल समोरील सेनापती बापट फ्लायओव्हरवरून एका कारने अचानक यु टर्न घेतला. यावेळी, समोरून वेगाने येणारी एक बाईक कारला धडकली. यावेळी, या बाईकवर असणाऱ्या २ तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२७ सप्टेंबर) रात्री घडली. संतापजनक तो कारचालक यावेळी कोणतीही मदत न करता तिथून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

भावेश अरूण संघवी आणि कृष्ण कुराडकर अशी या अपघातातील मृत तरुणांची नाव आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट दिसून येत आहे की, बुधावारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी एका कारने अचानक फ्लायओव्हरवर यू टर्न घेतला. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या बाईकला जबर धडक बसली. धक्कादायम म्हणजे तो कारचालक कोणतीही मदत न करता दादरच्या दिशेने पळून गेला. दरम्यान, या अपघातानंतर दोघांनाही नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी, एका तरुणाचा हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी तर दुसर्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

‘हीट अँड रन’

व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये असंही दिसून येत आहे, बाईकवरील दोन मृत तरुणांसोबतच दुसऱ्या बाजूने वेगळ्या बाईकवरून येणारा एक व्यक्ती देखील जखमी झाला आहे. मात्र, या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. अहवालानुसार, पोलिसांकडून संबंधित कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून हीट अँड रनसह संबंधित आरोप लावण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hit and run car makes u turn mumbai flyover two bikers killed gst

ताज्या बातम्या