वरळी हिट ॲन्ड रन प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर प्रदीप बीएमडब्ल्यूच्या बॉनेटवर आपटून डाव्या बाजूला पडले. तर कावेरी या मोटरगाडीच्या समोर पडल्या. परंतु, गाडी थांबवायची सोडून आरोपीने मोटरगाडी भरधाव वेगाने नेली. जवळपास दीड ते दोन किमीपर्यंत या महिलेला फरफटत नेलं आणि त्यानंतर तिच्या अंगावर अंगावरून गाडी नेऊन आरोपीने कारमधील जागा बदलून तिथे चालकाला बसवलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिहिर शाह आणि चालक राजऋषी बिडावत यांनी जागांची अदलाबदली केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, असं पोलिसांनी महानगर दंडाधिकारी सुहास भोसले यांना सांगितलं. अपघात झाल्यानंतर मीहिरने त्याच्या वडिलांना कॉल केला. वडिलांनी त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास सांगितलं आणि राजऋषी बिडावत अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितलं, असंही पोलीस म्हणाले.

सरकारी वकील भारती भोसले यांनी न्यायालयात सांगितले की, महिला गाडीचा टायर आणि बंपरमध्ये अडकली आणि आरोपींनी गाडी थांबवण्यापूर्वी तिला दीड-दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. राजऋषी बिडावत नंतर ड्रायव्हिंग सीटवर बसला, त्यानंतर त्याने गाडी रिव्हर्स केली आणि पळून जाण्यापूर्वी महिलेला बोनेटवरून खाली पाडले.”

त्यानंतर दोन्ही आरोपींनी सी लिंकवरून प्रवास केला. त्यानंतर त्यांनी वांद्र्यातील कलानगर भागात कारची मोडतोड केली अन् त्यांनी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इतर स्टिकर्समध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मिहिर तेथून पळून गेला, तर बिदावत गाडीसह घटनास्थळी थांबला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

“राजेश शाह नंतर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिदावतला सांगितले की त्यांनी टो वाहन मागवले होते, पण आम्ही त्याआधी पोहोचलो आणि दोघांना पकडले”, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “ड्रायव्हरने कबूल केले की शाह यांनी त्याला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितले होते.” पोलिसांनी असंही सांगितले की, त्यांना संशय आहे की शहा आणि बिदावत वाहनाची विल्हेवाट लावण्याची योजना आखत होते.

आरोपींचे निर्दयी कृत्य

मृत कावेरी या अपघातात मोटरगाडीच्या बंपर व चाकाच्या मध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेस येथे आरोपी मिहिर शहा व शेजारी बसलेला राजऋषी बिडावत मोटरगाडीतून बाहेर पडले. त्यांनी मोटरगाडीत अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले व तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली. सीसीटीव्ही चित्रीकरणातून अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सीसीटीव्हीत तपासणीत मरिन ड्राईव्हपर्यंत राजऋषी बिडावत हा मोटरगाडी चालवत होता. मरिन ड्राईव्हपासून पुढे मिहिर मोटरगाडी चालवत होता. वरळी सीफेस जवळ मोटरगाडीत अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढल्यानंतर राजऋषी चालकाच्या आसनावर बसला व गाडी चालवू लागला. त्यावेळी त्याने गाडी बाजूने न नेता थेट कावेरी यांच्या अंगावरून मोटरगाडी नेली.

हेही वाचा >> मुंबई महापालिका हद्दीतील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे पालिका प्रशासनाचा निर्णय

मिहिर मैत्रिणीच्या घरी

अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान जवळपास तीस ते चाळीस दूरध्वनी मैत्रिणीला केले. मैत्रिणीचे घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोन तास तेथे झोपला. मैत्रिणीने याबाबत त्याच्या घरी दूरध्वनी करून सांगताच, त्याच्या बहिणीने मैत्रिणीचे घर गाठले. त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवली येथील घरी गेली. तेथून घराला कुलूप आरोपी लावून आई मीना आणि बहिणीसह पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही आरोपी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?

बांधकाम साहित्याचा पुरवठा करणारे शाह यापूर्वी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख होते. ते सध्या शिंदे सेनेत आहेत. पोलिसांनी बीएनएस कलम १०५ (हत्येचा प्रयत्न करणे), २८१ (रॅश ड्रायव्हिंग), १२५ बी (गंभीर दुखापत करणे), २३८ (गुन्ह्याचा पुरावा गायब करणे, किंवा स्क्रीन गुन्हेगाराला खोटी माहिती देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ३२४-४. पोलीस) आणि मोटार वाहन कायदा १८७ (अपघाताशी संबंधित गुन्ह्यांची शिक्षा).

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case worli accused switched seats with driver who mowed down woman again sgk
Show comments