मुंबई : होळीनिमित्त मुंबई महानगरातून कोकणात मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेने घोषणा केलेल्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी सीएसएमटी – चिपळुण, रत्नागिरी आणि सावंतवाडी दरम्यान अतिरिक्त गाड्या चालविण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.
कोकणात होळी (शिमगा) मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. गणेशोत्सवानंतर होळीसाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. लाखो प्रवासी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे येथून त्यांच्या मूळ गावी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रवास करतात.
गणपती उत्सवादरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या किमान ७० टक्के गाड्या होळीकरिता २८ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत चालवण्याची विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.
मध्य रेल्वेने घोषणा केलेल्या गाड्या
सीएसएमटी-सावंतवाडी आणि एलटीटी-सावंतवाडी गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी धावणार आहेत.
