येत्या काळात नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. याकरिता एकूण २१ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोंडीतून ठाणेकरांची आजपासून होणार सुटका, बहुप्रतिक्षित कोपरी रेल्वे पूलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

मुंबईत मोठ्या संख्येने नोकरदार महिला राहतात. परगावातून, परराज्यातून नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या महिलांना मुंबईत राहण्यासाठी जागा मिळत नाही, किंवा घराचे भाडे परवडत नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सोडला होता. मुंबईचा विकास आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत वसतिगृहे उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा >>>मुस्लीम मतांसाठी चढाओढ, शिवसेनेच्या रणनीतीला तोंड देण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना

त्यानुसार गोरेगाव येथील पहाडी भागात नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह बांधण्याचे काम सुरू आहे. २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी २८. ४१ कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली होती. या ठिकाणी १६ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार असून ५,८८२.६८ चौ. मी. इतके बांधकामाचे क्षेत्रफळ आहे. विकास आराखड्यात त्याकरीता आरक्षण ठेवण्यात आले आहे.

याच धर्तीवर मुंबईत सात ठिकाणी सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. ज्या विभागात महिला कार्यरत आहेत, त्याच विभागात त्यांची राहण्याची सोय होणे शक्य होणार आहे. यामुळे मुंबईत घर नसणाऱ्या नोकरदार महिलांच्या निवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकणार आहे.