एका कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यू, विविध मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन

मुंबई : लोअर परळ कार्यशाळेत गुरुवारी वातानुकूलित रेल्वे डब्याचे देखभाल, दुरुस्तीचे काम करताना इलेक्ट्रीशियन संतोष गुंजाळ (४४) याचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ८.३० पासून तीन तास काम बंद आंदोलन पुकारले होते. अखेर पश्चिम रेल्वेने कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लोअर परळ कार्यशाळेत वीज विभागात कार्यरत असलेले संतोष गुंजाळ गुरुवारी दुपारी रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांची देखभाल, दुरुस्तीचे काम करीत होते. त्याच वेळी ते शिडीवरून कोसळले आणि यात त्यांना गंभीर दुखापत झाली. गुंजाळ यांना तात्काळ कार्यशाळेतील रुग्णालयातून लोअर परळमधील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

pune sassoon hospital marathi news
पुणे: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ससूनमध्ये अधीक्षकांचे ‘खुर्चीनाट्य’
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Encroachment by Navi Mumbai mnc
पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय

लोअर परळ कार्यशाळेत कर्मचाऱ्यांनी कामाचा ताण, कमी मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता इत्यादी कारणांसाठी शुक्रवारी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे कार्यशाळेतील काम ठप्प झाले. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या संबंधित विभागाने कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामाचा ताण, सुरक्षितता आदी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पश्चिम रेल्वेने गुंजाळ यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देतानाच या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.