मुंबईः अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास (३०) काही काळ वरळी कोळीवाड्याच्या शेजारी असलेल्या जनता कॉलनी परिसरात राहून गेल्याचा संशय आहे. त्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्या परिसराला भेट देत आहेत. ज्या घरात आरोपी राहून गेल्याचा संशय आहे. तेथील शेजाऱ्यांना मात्र आरोपीबाबत कोणतीही माहिती नाही. इथे अंडी विकणारी मुले राहतात. त्यांना पोलीस चौकशीसाठी पोलीस घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

आरोपी शहजाद सोबत राहिल्याच्या संशयावरून दोन व्यक्तींची गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पण तेव्हापासून जयहिंद मित्र मंडळातील खोली बंद आहे. शेजाऱ्यांना याबाबत विचारले असता गेल्या दोन दिवसांपासून त्या परिसरात मोठ्याप्रमाणात गुन्हे शाखेचे पोलीस येत आहे. शेजारच्या घरात कोण येते आम्हाला काही माहित नाही. पण इथे अंडी विकणारी दोन मुले राहतात. आता त्यांच्यासोबत कोण राहून गेले याची माहिती नाही. पण पोलिसांनी आम्हाला याबाबत विचारल्याचे शेजारी राहणाऱ्या महेश ठाकूर यांनी सांगितले. त्याच ठिकाणी ऑगस्ट महिन्यातही आरोपी राहिल्याचा संशय आहे.

Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त

हेही वाचा – “हो, मीच केलं…”, आरोपीची कबुली, सैफवरील हल्ल्याचे प्रकरण

आरोपी शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगला देशातून मुंबईत आल्यावर तो काही काळ मुंबईतील वरळी कोळीवाड्या शेजारी असलेल्या जनता कॉलनी येथे वास्तव्याला होता, अशी माहिती कळते आहे. त्याची पडताळणी करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपीसह राहणाऱ्यांना दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी मुंबईत हाऊस किंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस पथक जनता कॉलनी परिसरातही आले होते. आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्या अंतर्गत कलमांची वाढ करण्यात येणार आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता. आरोपीला ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. तेथे आरोपी हिरानंदानी इस्टेट येथील झाडीमध्ये लपून पसला होता. अखेर त्याला ताब्यात घेऊन वांद्रे येथे आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला सुरुवातीला चेंबूर पोलीस ठाणे व त्यानंतर खार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – Saif Ali Khan Latest News : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईत नेमका कुठे वास्तव्याला?

आरोपीला सैफ हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्याला रविवारी न्यायालालयापुढे हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखा, तसेच मुंबई पोलिसांच्या १०० जणांची विविध पथके तयार केली होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

Story img Loader