‘गृहनिर्माण सोसायटय़ा प्रशासकांकडून बिल्डरांच्या ताब्यात’

करोनामुळे निवडणुका वेळीच घेता आल्या नाहीत.

मुंबई : करोनामुळे सर्वसाधारण सभा न झाल्याने नियुक्त झालेल्या प्रशासकांनी मुंबईतील ५०० गृहनिर्माण सोसायटय़ांच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव परस्पर बिल्डरांना मंजूर करून दिले. सुमारे दोन हजार कोटींच्या या गैरव्यवहाराला तातडीने स्थगिती देऊन विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी शुक्रवारी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे केली.

ज्या सोसायटीच्या समित्यांचा कालावधी गेल्या दोन वर्षांत संपत होता, त्यांना करोनामुळे निवडणुका वेळीच घेता आल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश सोसायटीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रशासक बिल्डर्सच्या संगनमताने, सोसायटी व्यवस्थापन समितीच्या अनुपस्थितीत आणि नियमांचे उल्लंघन करून परस्पर सोसायटीच्या पुनर्विकासाचे निर्णय घेत आहेत. सुमारे दोन हजार कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पांचे निर्णय घेण्यात आल्याची भीती शेलार यांनी कवडे यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Housing society administrators take over builders akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या