‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे मार्च, २०१५मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार २७मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकालही बुधवारीच जाहीर करण्यात येणार आहे. दोन महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होणार असल्याने बुधवार हा ‘निकाल दिन’ ठरणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने २७८९ ३७ ५६ या दूरध्वनी क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे. तसेच, ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अपयश आलेल्या किंवा निराश झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय स्तरावर समुपदेशन सेवाही देण्यात येणार आहे. या शिवाय सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकालही बुधवारी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (लोकसत्ताच्या मंगळवारच्या अंकात निकालाची तारीख अनवधाने २७ जुलै अशी छापून आली होती)

समुपदेशकांचे भ्रमणध्वनी
वि. वि. शिंदे – ९८२००७३७८२, ए. डी. सरोदे – ९३२२५२७०७६, स्मि. न. शिपुरकर – ९८१९०१६२७०
संजय चौधरी – ९८६९०२२२२४, मुरलीधर मोरे – ९३२२१०५६१८, विकास जाधव – ९८६७८७४६२३,
बी. के. हयाळीज – ९४२३९४७२६६, मुकेश दांगट – ९००४८४२९८९, चं.ज.मुंढे – ९८६९३०७६५७,
श्रीकांत सिंगारे – ९८६९६३४७६५