मुंबई विभागाचा निकाल ९९.७९ टक्के

राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाचा बारावीचा निकालही भरघोस लागला असून नाममात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

बारावीच्या वाढलेल्या निकालामुळे स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण वाढणार?

मुंबई : राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाचा बारावीचा निकालही भरघोस लागला असून नाममात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बारावीची परीक्षा दिलेले ९९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे. वाढलेल्या निकालामुळे यंदा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मंडळाच्या परीक्षेत मुंबई विभागातील साधारण दीड हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या विभागाचा निकाल ९९.७९ टक्के लागला असून २ लाख ९३ हजार ४७९ नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३४ हजार ६७५ आहे. विभागातील पुनपरीक्षार्थीचा निकाल ८४. ८९ टक्के  लागला आहे.

मुंबई विभागाचा शाखानिहाय निकाल

  • विज्ञान     ९९.५८
  • वाणिज्य    ९९.९०
  • कला    ९९.७८
  • किमान कौशल्याधारित अभ्यासक्रम        ९९.४२

महाविद्यालय बदलण्याची संधी मिळणार?

वाढलेल्या निकालामुळे यंदा महाविद्यालयांच्या पात्रता गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठातील, स्वयत्त महाविद्यालये येथील स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. या अभ्यासक्रमांसाठीचे पात्रता गुण गेल्यावर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. मोठय़ा संस्थांमध्ये त्यांच्याच कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश कायम केल्यास अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलण्याची संधीही मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hsc result maharshtra mumbai students mumbai ssh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या