‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

लोअर परळ येथील सहकार एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाने बारावीच्या २१० विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न भरल्याने राज्य शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवला होता.

लोअर परळ  येथील सहकार एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाने बारावीच्या २१० विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न भरल्याने राज्य शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवला होता. निकाल जाहीर होऊन दोन दिवस मिळाले तरी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निकाल समजू न शकल्याने विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. अखेर मनविसेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाचालकांची भेट घेत शिक्षण मंडळाला निकाल जाहीर करण्याची विनंती केली. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी २ वाजता ऑनलाइन जाहीर केला. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने परीक्षा शुल्क घेतले, परंतु ते मंडळाकडे जमा न केल्याने मंडळाने महाविद्यालयातील २१० विद्यार्थ्यांचा निकाल रोखला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hsc results

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या