मुंबई : २०१८ ते २०२२ जवळपास चार वर्षांहून अधिक काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहात अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिकेसाठी अभिनेता शाहरूख खानची घेतलेली मेहनत ‘पठाण’च्या रूपात फळाला आली. त्याच्या या चित्रपटाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता पहाटेचा आणि मध्यरात्रीचा असे आणखी दोन खेळ वाढवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशराज प्रॉडक्शनच्या ‘गुप्तहेर चित्रपट’ मालिकेतील तिसरा आणि शाहरूख खानचा ‘अ‍ॅक्शन’ भूमिकेतील पहिला चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी देशभरात प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला पाच हजार चित्रपडद्यांवर हा चित्रपट प्रदर्शित केला. मात्र चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद आणि चित्रपट पाहिल्यानंतर झालेली चर्चा लक्षात घेऊन या चित्रपटाचे खेळ वाढवण्यात आले आहेत. आता हा चित्रपट दिल्ली एनसीआर, मुंबई अशा प्रमुख शहरांसह देशभरात एकूण साडेआठ हजार चित्रपडद्यांवर दाखवण्यात येणार आहे. याशिवाय, दिल्ली आणि मुंबईत या शोचे सकाळी ६ आणि ७ वाजताचे शो तसेच मध्यरात्री साडेबाराचा शोही वाढवण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर शाहरूखचे रुपेरी पडद्यावर झालेल्या पुनरागमनाचे त्याच्या चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to shahrukh khan s movie pathaan across the country after release zws
First published on: 26-01-2023 at 02:23 IST