हुसेनसागर एक्स्प्रेसचे दोन डबे सीएसटी स्थानकात घसरले, जीवितहानी नाही

उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

husain sagar express
Husain sagar express: दररोज रात्री ९.५० वाजता हैदराबादकडे निघणारी ही गाडी आता मंगळवारी (दि. ११) पहाटे चार वाजता निघणार आहे.

मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसचे दोन डबे सीएसटी स्थानकात घसरले. माझगाव यार्डमधून ही गाडी सीएसटी स्थानकात येत होती. त्यावेळी हा अपघात झाला. सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दररोज रात्री ९.५० वाजता हैदराबादकडे निघणारी ही गाडी आता मंगळवारी (दि. ११) पहाटे चार वाजता निघणार आहे. इंजिनपासून सातवा आणि आठव्या क्रमांकाचा डबा फ्लॅटफॉर्म क्रमांक ९ जवळ हे घसरले. डबे घसरल्याचा उपनगरीय रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Husain sagar express derail at cst station

ताज्या बातम्या