Premium

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या; पतीला अटक

नजराणा खातून शेख (४१) असे मृत महिलेचे नाव आहे.

husband arrested killing wife hammer mumbai
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या; पतीला अटक (संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार शनिवारी रात्री शिवडी परिसरात घडला. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली. चारित्र्यावरील संशय व पत्नीशी झालेल्या भांडणातून हत्या असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

नजराणा खातून शेख (४१) असे मृत महिलेचे नाव आहे. ती शिवडी येथील कौलाबंदर परिसरात राहत होती. तिचा पती अब्दुल सलीम मोहम्मद राहून शेख (४६) हा व्यवसायाने वायरमन आहे. पत्नी नजराणा शेख हीचे परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. त्यामुळे पत्नी आरोपीला घरात राहू देत नव्हती. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने शिवडी चांदणी चौक येथील हिंदू स्मशानभूमीत पत्नीच्या डोक्यात हातोडा मारला. त्यातच ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. तिला जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले.

हेही वाचा… “अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही”, राज ठाकरेंची सुलोचनादीदींविषयी भावनिक पोस्ट

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी पती शेखला घटनास्थळावरून अटक केली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव जानकर यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख विरोधात अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेला हातोडा पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband arrested for killing his wife in mumbai print news dvr

First published on: 05-06-2023 at 12:00 IST
Next Story
“अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही”, राज ठाकरेंची सुलोचनादीदींविषयी भावनिक पोस्ट