पुणे : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; कात्रज घाटात फेकला होता मृतदेह!

आरोपी पत्नीसह चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

crime-1-1
प्रतिनिधिक छायाचित्र

अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा एका महिलेने आपल्या प्रियकारच्या मदतीने खून केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे एका महाराजासोबत प्रेमसंबंध होते, ही माहिती तिच्या पतीला समजल्याने पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असत. अखेर प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचा या महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केला. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

आनंद गुजर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांची पत्नी सरोज गुजर, रमेश कुंभार (रा. वाल्हेकरवाडी), यश योगेश निकम आणि अनिकेत ऊर्फ अमोल रामदास बडदम या चौघांना या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज घाटात काल(शनिवार) एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी केल्यावर, तिथे एक दुचाकी आढळून आली. त्या दुचाकीच्या नंबरवरून आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चासीवरून ही दुचाकी मृत आनंद गुजर यांची असल्याचे स्पष्ट झाले.

तसेच पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू असताना. आम्हाला समजले की, मृत आनंद यांच्या पत्नीचे महाराज असलेल्या रमेश कुंभार याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पत्नी सरोज ही रमेश कुंभार याच्या सोबत राहत होती. तर पती आनंद गुजर हा महाराज असलेल्या रमेश कुंभार याच्या मठात गेला होता. तेव्हा पत्नी आणि रमेश कुंभार सोबत त्याचा वाद झाला. त्यामध्ये तेथील महाराज, पत्नी आणि दोघांनी आनंद याला मारहाण केली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चौघांनी आनंदा गुजर यांचा मृतदेह कात्रज घाटात आणून टाकला आणि त्यांची दुचाकी मृतदेहाच्या बाजूला लावून निघून गेले. आनंद यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा प्लॅन त्यांचा होता. पण त्यांचा बनाव काही तासात उघड करण्यात पोलिसांना यश आले. असे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Husband murdered by wife with the help of boyfriend msr 87 svk

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या