मेरा अमरावतीसे बहुत पुराना रिश्ता है.. असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यावर ते म्हणाले अरे बाबांनी मी खरंच सांगतो आहे. कारण मला फेकाफेकी करत नाही मला ती सवय नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला आहे. सकाळच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हा उल्लेख केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी भाजपा, एकनाथ शिंदे यांनाही टोले लगावले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“प्रबोधनकार ठाकरे हे माझे आजोबा. मी जर जुन्या आठवणी सांगू लागलो तर तुम्हाला हसू येईल. मी जर असं म्हटलं की मेरा अमरावतीसे बहुत पुराना रिश्ता है. एकदम साधं वाक्य आहे हसू नका. कारण माझी आजी ही अमरावतीतल्या परतवाड्याची. मी उगाच फेकाफेकी करत नाही. जातो तिथे मी जवळची नाती जोडत नाही. जी नाती आहेत ती आहेत. ” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला आहे.

निर्ल्लजाला निस्पृह होता येत नाही

“प्रवाहाबरोबर वाहात जाणारे अनेक लोक असतात. पण हा चुकीच्या मार्गाने चालला आहे ते थांबवता आलं पाहिजे. निस्पृह होता आलं पाहिजे. निर्ल्लजाला निस्पृह होता येत नाही. त्यामुळेच दुसऱ्याच्या वडिलांचा फोटो चालवून आपला पक्ष चालवत आहेत काही लोक. जे काही चाललं आहे ते मी बघू शकत नाही त्यामुळे ते बदलणार. ढोंगावर लाथ मारणं हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व होतं. ढोंग असेल तिथे लाथ मार हे त्यांचं तत्व होतं. त्यामुळे प्रबोधनकार हवेसे वाटतात पण पेलवत नाहीत.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी काही गोष्टींना आपण हिडीस म्हणायचो. आता गोष्टी ‘ईडी’सपणे चालल्या आहेत. मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं. शरद पवार त्याला जबाबदार आहेत. मला जे जमेल ते केलं. तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं. मला कुटुंबप्रमुख समजत होतात, ती माझ्या आयुष्याची कमाई आहे असं मला वाटतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.