भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज महाविकास आघाडीचा नवा घोटाळा बाहेर काढण्यासंदर्भातील इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय. राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये १०० कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केलाय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांना सोमय्यांच्या आजच्या नियोजित पत्रकार परिषदेसंदर्भात विचारण्यात आलं असतं त्यांनी टॉयलेट घोटाळ्यासंदर्भात वक्तव्य केलं.

नक्की वाचा >> शरद पवारांवर केल्या जाणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांवरुन राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “पुढील २५ वर्ष भाजपाला…”

“आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झालाय. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत” असं म्हणत राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर निशाणा साधलाय. “हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे,” असा आरोप राऊत यांनी केलाय.

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Uday Samant, Uddhav thackeray, Uddhav thackeray working style, Uday Samant criticise Uddhav thackeray, party mla left Uddhav thackeray, victory Confidence in mahayuti, lok sabha 2024,
“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली……
sangli lok sabha seat, nana patole, sanjay raut, congress, shivsena uddhav thackarey, lok sabha 2024, election 2024, maha vikas aghadi, conflict in maha vikas aghadi, maharashtra politics, maharashtra news, marathi news, sangli news, election news,
“संजय राऊत यांनी नाटके बंद करावी,” नाना पटोले यांचा सल्ला; म्हणाले, “त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

पुढे बोलताना राऊत यांनी, “या घोटाळ्याचे कागद पाहून मला हसायला आलं. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरं म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार कणव आहे. राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते भाजपाच्या लोकांची. कालपण मी पाहिलं शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केलेत. एखादं ट्विट त्यांनी आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवं. एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावर करावं जो आम्ही काढणार आहोत. १०० कोटींच्या वर आहे टॉयलेट घोटाळा,” असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नक्की वाचा >> “भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून एका रांगेत दिलासे कसे मिळतात?; न्यायव्यवस्थेवर कोणाचा…”; राऊतांनी उपस्थित केले प्रश्न

पुढे बोलताना सोमय्यांवर निशाणा साधत राऊत यांनी, “आता ते टॉयलेटमध्ये घाण करुन ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत. पुरावे कुठेत हे त्यांनाही माहितीय. अहवाल काय आहे हे ही माहितीय. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला घोटाळा आहे. याला टॉयलेट घोटाळाच म्हणता येईल दुसरा कोणता शब्द मी वापरत नाही,” असं म्हटलं आहे.

“तुम्ही अशा कितीही प्रकारचे आमच्यावर हल्ले केले, फुसके बार सोडले तरी काही होणार नाही. आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्या. विक्रांतवर तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत. सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. सत्र न्यायालय मुर्ख आहे का? ती सुद्धा न्यायव्यवस्थाच आहे ना. त्यांना सुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये मानाचं स्थान आहे. हुशार लोक आहेत ती. न्याय मागायला तिथं जावं लागतं. तुम्हाला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानाची ठपका ठेवलाय. पैसे गोळा केले तुम्ही, ते कुठे आहेत हे माहिती नाही आणि तुम्ही पुरावा काय मागताय. राजभवन सांगतंय तुमचं की पैसे जमा झाले नाहीत, अजून कसला पुरावा पाहिजे न्यायालयाला? बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झालेला नाही. १२ वर्ष तुम्ही पैसे हडप करुन बसला त्याच्यावर राजभवनाने जो कागद लिहून दिलाय आम्हाला त्यावर गुन्हा दाखल झालाय. लोकांची दिशाभूल करु नका,” असंही राऊत यांनी सोमय्यांवर टीका करताना म्हटलंय.