मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या(MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दिपेंद्र सिंह कुशवाह यांची तर सिडकोच्या(CIDCO) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात(MMRDA) अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी प्रशासनात फेरबदल करताना काही सदनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह यांची एमआयडीसीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर एमएमआडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. प्राजक्ता लवंगारे वर्मा यांची नियुक्ती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून जर अश्विनी जोशी यांची एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर विकास आयुक्तपदी कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ‘विशेष कार्य अधिकारी’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पी.वेलारासू यांची वनविभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. संजय काटकर यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, एनएचएम या पदावर तर झेनिथ चंद्र डोंथुला यांची गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.अनय नवनदार यांची नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.