इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन परिषदेतर्फे २०१६मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ९८.०५ टक्के इतका लागला असून निकालात मागच्या वर्षीच्या तुलनेत ०.०१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दहावीच्या परीक्षेला देशांतील आणि परदेशांतील केंद्रांतून एक लाख ६८ हजार ५९१ विद्यार्थी बसले होते. यात ९२९०० विद्यार्थी आणि ७५६९१ विद्यार्थिनींचा समावेश होता.

यापैकी ९११७२ मुलगे आणि ७४८८५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेत ७२०६९ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३७०२३ विद्यार्थी आणि ३२४९८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात दहावीची ही परीक्षा १७९ तर बारावीची ४० केंद्रांवर पार पडली होती.

यात दहावीसाठी राज्यातून १६३९९ तर बारावीसाठी २४३५ विद्यार्थी बसले होते. यापैकी दहावीत ९९.७७ टक्के तर बारावीत ९८.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.