कमला मिल्स आग : …तर, दुर्घटना रोखता आली असती!

बीएमसीने ‘या’ तक्रारींकडे केले अक्षम्य दुर्लक्ष

माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळस्कर.

मुंबईतील कमला मिल्स परिसरात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू आणि मोठी वित्तहानी झाली. मात्र, येथे झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींना जर बृहन्मुंबई महानगर पालिकेने (बीएमसी) गांभीर्याने घेतले असते तर ही दुर्घटना रोखता आली असती असा दावा मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळस्कर यांनी केला आहे.


काळस्कर म्हणाले, मी कमला मिल्स परिसराती अनधिकृत बांधकांमांबाबात बीएमसीकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, ही बांधकामे अधिकृत असल्याचे सांगत प्रत्येक वेळी बीएमसीने माझ्या तक्रारींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. ही बाब पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतली असती तर ही भीषण दुर्घटना रोखता आली असती. यामुळे या दुर्घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली.

टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते. धुरामुळे श्वास गुदमरुन येथील १४ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पबमध्ये एका वाढदिवसाची पार्टी सुरु होती. या पबमध्ये अत्यावश्यक अग्नीशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर आग लागल्यानंतर तातडीने बाहेर जाण्याचा मार्गही येथे बनवण्यात आलेला नव्हता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: If bmc had taken seriously of this complaints so there would have been stop an accident

ताज्या बातम्या