“बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर खरोखर तुम्हाला लाभले असते, तर...”; राऊतांची फडणवीसांवर टीका! | If you really got the blessings of Balasaheb Thackeray you would be the Chief Minister today Raut criticizes Fadnavis msr 87 | Loksatta

“बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर लाभले असते, तर…”; राऊतांची फडणवीसांवर टीका!

“शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केलेत, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी आहे.”, असंही बोलून दाखवलं.

“बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर लाभले असते, तर…”; राऊतांची फडणवीसांवर टीका!
(संग्रहीत छायाचित्र)

“कितीही भ्रम निर्माण केला तरी या राज्याची जनता ते स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर खरोखर लाभले असते तर आपण आज राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागतय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव ही आग आहे. त्या आगीशी खेळू नका.” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नुसते हात पोळलेले नाही. तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळलेली आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत जनता त्यांचा निर्णय घेईल. त्यांच्याविषयी बोलणं आता आम्ही थांबवलेलं आहे कारण आता ते महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल, तर तो त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.”

तसेच, “महाराष्ट्राच्या मातीत कधी ढोंगीपणाला, खोटेपणाला स्थान दिलं गेलं नाही, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केलेत, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी आहे. आजही भाजपाला महाराष्ट्रात स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसैनिक मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागतात. यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं महत्व अधोरेखीत होतय.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
परशुराम घाटात दरड कोसळली; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
मुंबई: बीडीडी चाळ प्रकल्पासाठी म्हाडाला ‘झोपु’कडून दोन हजार कोटींचे कर्ज हवे!
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड
पुणे : थंडी पुन्हा पळाली ; पावसाळी स्थितीचा अडथळा – आठवडाभर तापमानात वाढ
हास्यजत्रा फेम शिवाली परबला मिळाली नवी मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Video: सरन्यायाधीश चंद्रचूड लपूनछपून करायचे ‘रेडियो जॉकी’ची नोकरी; म्हणाले, “मी ‘प्ले इट कूल’, ‘डेट वीथ यू’ तसेच…”