मुंबई : ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधारणपणे पार्किन्सन हा आजार मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. या आजाराचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार सुरू करून त्याचे परिणाम कमी करणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर पार्किन्सनचे निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी आयआयटी मुंबईकडून ‘स्कॅन’ हे विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

पार्किन्सन हा आजार मेंदूशी निगडित असून, यामुळे शरीरावरील मेंदूचा ताबा सुटतो. मनुष्याच्या मेंदूतील न्यूरोनल पेशी नष्ट झाल्याने हा आजार संभवण्याची शक्यता असते. मात्र आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या ‘स्कॅन’ या तंत्रज्ञानामुळे पार्किन्सनचे निदान वेळेत होण्यास मदत होणार आहे. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने आयआयटी मुंबईने ‘स्कॅन’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान ९५ टक्के अचूक पार्किन्सन आजाराचे निदान केल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे संशोधन तुकडीचे प्रमुख आणि जैव विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. समीर माजी यांनी सांगितले.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क

या तंत्रज्ञानाचे ९ जानेवारीला आयआयटी मुंबईत उद्घाटन करण्यात आले. हे तंत्रज्ञान बाजारामध्ये पोहचविण्यासाठी सुनीता संघी सेंटर ऑफ एजिंग अ‍ॅण्ड न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसीजेसकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पार्किन्सनमुळे शारीरिक व मानसिक नुकसान होतेच मात्र त्याचबरोबरच महागडय़ा उपचारांमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. ‘स्कॅन’ हे पार्किन्सनसारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. 

प्रा. सुभाषिस चौधरी, आयआयटी मुंबईचे संचालक

भारताची सध्याची आरोग्य व्यवस्था आणि राहणीमान यामुळे आयुर्मानात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. मात्र देशातील वृद्ध हे विविध प्रकारच्या न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांनी ग्रस्त होत आहेत. ‘स्कॅन’ या तंत्रज्ञानामुळे वृद्धांना न्यूरोडीजनरेटिव्ह आजारांचा सामना करण्यास मदत होणार आहे.

– प्रा. समीर माजी, ‘स्कॅन’ संशोधन तुकडीचे प्रमुख