तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधाची तयारी

मुंबई : करोनाकाळात गेल्या दोन वर्षांत मुंबई महापालिके ने जी नवनवीन धोरणे आखून राबवली, त्यांचा इंडियन इन्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी, मुंबई)तर्फे   अभ्यास केला जाणार आहे.

ही धोरणे योग्य होती का, त्यात काही त्रुटी राहिल्या का याचा विशेषत: अभ्यास के ला जाणार आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आल्यास या त्रुटी सुधारून त्यानुसार उपाययोजना के ल्या जाणार आहेत.

करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिके ने ज्या उपाययोजना आखल्या त्याचे देशभर व जागतिक पातळीवरही कौतुक होत आहे. मुंबई महापालिकेने या काळात स्वत:ची अशी काही वेगळी वैशिटय़पूर्ण धोरणे राबवली. ही धोरणे खरोखरच नागरिकांसाठी किंवा करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त ठरली का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. पालिके ने आयआयटी मुंबईला तसे पत्रही दिले आहे.

करोनाकाळात पालिके ने चेस द व्हायरस, मिशन सेव्ह लाईफ, विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम) अशी विविध धोरणे राबवली. ही धोरण खरोखरच यशस्वी ठरली का याचा याअंतर्गत अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या सर्व धोरणांचे त्रयस्थ पक्षकारांकडून मूल्यमापन करण्यात यावे याकरीता अभ्यास के ला जाणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करताना चुका सुधारून त्यानुसार धोरणे तयार करता येतील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले. तिसऱ्या लाटेबरोबरच भविष्यात जेव्हा पुढची पिढी करोना या आजाराचा आणि उपाययोजनांचा अभ्यास करील तेव्हाही या मूल्यमापनाचा त्यांना उपयोग होऊ शकतो, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त के ले आहे.

विद्यार्थ्यांच्या कार्यालय भेटी

या अभ्यासाकरीता ‘आयआयटी, मुंबई’चे विद्यार्थी पालिके च्या कार्यालयांना भेटी देतील, करोनाप्रतिबंधक उपाययोजनांचे काम कसे चालते ते बघतील, आकडेवारीचा अभ्यास करतील, प्रत्येक धोरणाचे फायदे-तोटे, कोणत्या विभागात रुग्णसंख्या वाढली, कु ठे मृत्यूदर जास्त होता या सगळ्याचा त्यात अभ्यास के ला जाणार आहे.