Illegal employees National Stock Exchange Sanjay Pandey arrested ysh 95 | Loksatta

संजय पांडे यांना अटक

राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.

संजय पांडे यांना अटक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (फोटो- एएनआय)

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सीबीआयने पांडे यांना शनिवारी नवी दिल्ली येथे अटक केली. न्यायालयाने संजय पांडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यापूर्वी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने पांडे यांना अटक केली होती.

एक खासगी कंपनी आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून राष्ट्रीय शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या दूरध्वनी अभिवेक्षण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने जुलै २०२२ रोजी संजय पांडे यांचे निवासस्थान, तसेच कार्यालयांवर छापे घातले होते. तसेच संजय पांडे यांच्याबरोबरच त्यांच्या कंपनीच्या सध्याच्या संचालक पांडे यांची आई संतोष पांडे आणि मुलगा अर्मान पांडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्याचे पालकमंत्रीपद शंभूराज देसाईंकडे; फडणवीस यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी

संबंधित बातम्या

‘तो’ कबुतराचं मांस चिकन म्हणून हॉटेल्सला विकायचा; मुंबईमधील धक्कादायक प्रकार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले “हे अनैतिक…”
जुळ्या बहिणींशी लग्न करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या, “सोलापूरमधील एका…”
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम
नायजेरियात मशिदीवर अंदाधुंद गोळीबार; इमामसहीत १२ जणांचा मृत्यू, तर १९ जणांचे अपहरण
FIFA World Cup 2022: इंग्लंडचा सेनेगलवर दमदार विजय; आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सशी होणार सामना