मुंबई : विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून २९ कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या परदेशांतून आयात केलेले खाद्यपदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे खाद्यपदार्थ आयात केल्यानंतर ते ज्या शीतगृहात ठेवले जातात तेथे काळजी घेत नसल्यामुळे दर्जाबाबतच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तुर्भे येथील मे. सावला फूडस् अ‍ॅण्ड कोल्ड स्टोरेजवर अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. त्या वेळी या धाडीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. आयात केलेल्या खाद्यपदार्थाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास ३५ नमुने चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, असे राठोड यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imported food substandard action of food and drug administration seize goods worth 29 crores ysh
First published on: 07-11-2022 at 00:02 IST