सचिन डांबली (३८) गाडी चालवत होते. सचिन आणि त्यांचे वडिल विष्णू (६२) यांचा अपघातानंतर काही तासाने मृत्यू झाला. त्यांना राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सचिन यांचा मुलगा विश्वास (१०) या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सचिन यांची पत्नी शुभांगी (३२), मुलगी नम्रता (११), अमोल कंकर, नंदा आणि जयश्री पवार (६) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सुद्धा राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री डांबली कुटुंब मुंबईला येण्यासाठी निघाले. रात्रीच्या जेवणासाठी हे कुटुंब कसारा येथे ढाब्यावर थांबले होते. गाडी चालवताना सचिन यांना डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांच्या जीपमधील फक्त एक जण या अपघातात जखमी झाला आहे.