लाभ, लोभ, आनंद, दु:ख अशा एक ना अनेक मानवी भावना जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या वापरात असलेल्या ट्विटर या समाज माध्यमाने भारतात दशकपूर्वी केली. यानिमित्ताने दहा वर्षांपूर्वी २१ मार्च रोजी प्रसिद्ध झालेले ट्वीट दिवसभर ट्विटरवर फिरत होते. याचबरोबर दहा वर्षांत ट्विटरला एक वेगळी ओळख करून दिल्याबद्दल देशभरातील तंत्रचाहत्यांचे अभिनंदनही त्यांनी केले. देशभरात ट्विटरचे लाखो वापरकर्ते असून एका मिनिटाला शेकडो ट्वीट्स पडत असतात किंवा रिट्वीट होत असतात.

या दशकपूर्तीच्यानिमित्ताने ट्विटरने दहा वर्षांतील महत्त्वपूर्ण ट्वीटस कोणते याबाबतचा तपशील प्रसिद्ध केला आहे. पाहुयात कोणत्या आहेत या घटना..

  • २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ट्विटरमुळे ताज हॉटेलमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्यांना बाहेरच्यांशी संपर्क साधण्यात आला होता. यामुळे आतील परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेणे शक्य झाले. याचबरोबर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बातम्या पोहचवण्यासाठी ट्विटरचा प्रभावीपणे वापर केल्याची नोंद आहे.
  • यानंतर सर्वाधिक ट्विटरचा वापर झाला तो म्हणजे २०११ मध्ये भारताने क्रिकेटचा विश्वचषक आपल्या नावे केला होता तेव्हा. त्या वेळेस अनेक क्रिकेट चाहत्यांसह देशभरातील नेत्यांनी ट्वीट करून आपला आनंद व्यक्त केला होता.
  • यानंतर २०१३ मध्ये दिल्लीत निर्भया प्रकरणात निषेध व्यक्त करणारे अनेक ट्वीट्स त्या वेळी प्रसिद्ध झाले होते. यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वाच्या ट्वीटचा समावेश होता.
  • पुन्हा एकदा २०१३ मध्ये सर्वाधिक ट्वीट्स नोंदविल्या गेल्या त्या सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्यावेळी. सचिन निवृत्त झाला तेव्हा त्याला भेटलेल्या अनेक चाहत्यांनी ट्वीट्सच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. याचबरोबर त्याला शुभेच्छा देणारे अनेक संदेशही त्या वेळेस ट्वीट करण्यात आले होते.
  • यानंतर ७ एप्रिल ते १२ मे या काळात रंगलेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी ट्वीट्सच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचत होती. यात निवडणुकांच्या बातम्यांसह पक्षीय भेदाभेद, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक बाबी नोंदविल्या गेल्या.
  • मे २०१४ मध्ये ट्विटरवर पुन्हा एकदा महत्त्वाची घटना नोंदविली गेली ती म्हणजे दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांतने ट्विटर खाते सुरू केले आणि अवघ्या २४ तासांच्या आत त्याला दोन लाख फॉलोव्हर्स मिळाले.
  • सप्टेंबर २०१४ मध्ये विज्ञान क्षेत्रात भारताचा ठसा उमटविणाऱ्या मंगळयान या मोहिमेवर मोठय़ा प्रमाणावर ट्वीट्स करण्यात आले. खुद्द इस्रोने हे अभियान यशस्वी झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
  • ऑगस्ट २०१५ मध्ये प्रथमच एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या नावावर ट्विटर खाते सुरू करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी आग्रा येथील ताजमहलचे  ट्विटर खाते सुरू झाले.
  • २०१५च्या दिवाळीत ट्विटरने भारतीयांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विशेष छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्या छायाचित्राला दहा लाखांहून अधिक रिट्वीट मिळाले होते.