scorecardresearch

Premium

राज्यात डोळे येण्याची साथ आटोक्यात

१ ऑक्टोबरच्या अहवालानुसार संपूर्ण राज्यामध्ये डोळे आलेला एकही रुग्ण आढळला नाही.

Maharashtra outbreak conjunctivitis under control mumbai
राज्यात डोळे येण्याची साथ आटोक्यात (Photo Courtesy- Freepik)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: पावसाळा सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये डोळे येण्याची साथ पसरली होती. राज्यामध्ये दिवसाला साधारणपणे दररोज १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील डोळे येण्याची साथ आटोक्यात येत होती. मात्र १ ऑक्टोबरच्या अहवालानुसार संपूर्ण राज्यामध्ये डोळे आलेला एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आटोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.

rain forecast, heavy rain in maharashtra, yellow alert for mumbai and pune, rain updates maharashtra, heavy rain forecast for 3 districts
Weather Update: येत्या २४ तासात राज्यात मुसळधार; बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
nagpur flood
नागपूरमध्ये नियोजनशून्यतेचा पूर
drought
निम्म्या राज्यावर संकट; राज्यातील ३५५ पैकी १९३ तालुके अवर्षणग्रस्त
Meteorological department , Vidarbha Marathwada , Khandesh, rain in Vidarbha , rain , heavy rain, Rain News in Maharashtra
पावसाचा जोर शनिवारी वाढणार; विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांसह पावसाचा इशारा

राज्यामध्ये ऑगस्ट सुरू झाल्यापासून डोळे आलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक होते. राज्यामध्ये आतापर्यंत ५ लाख ५६ हजार ४३० रुग्ण सापडले आहेत. पुण्यामध्ये सर्वाधिक ५२ हजार ५४२ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात ५० हजार ५१३, जळगाव २९ हजार ८५६, चंद्रपूर २७ हजार ३५५ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा… मुंबई: विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

ऑगस्टमध्ये दिवसाला सरासरी १० ते १२ हजार रुग्ण सापडत होते. डोळे येण्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत होते. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून डोळे येण्याची साथ हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील १ ऑक्टोबर रोजी रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यामुळे डोळे येण्याची साथ आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In maharashtra the outbreak of conjunctivitis has come under control mumbai print news dvr

First published on: 03-10-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×